मुलांच्या विरहामुळे आलेल्या नैराश्येतून पुणे येथील पित्याची गळफास घेऊन आत्महत्या !

प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे कसे महापाप आहे, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे. साधना केल्याने आत्मबल वाढते आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळते.

पुणे, २५ सप्टेंबर –  ४० वर्षीय संजीव कदम यांनी रहात्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडली आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचे (१ मुलगा आणि १ मुलगी) १ वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते, तेव्हापासून ते निराशेत होते. मुलांच्या विरहामुळे नैराश्येतून कदम यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हवेली पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील अन्वेषण चालू आहे.