सारथी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ६० जणांचे रक्तदान !

रक्तदान शिबिराच्या प्रसंगी लष्करी अधिकार्‍यांसमवेत सारथी फाऊंडेशनचे स्वयंसेवक

मिरज, १९ ऑगस्ट (वार्ता.) – पू. संतोष दाभाडेमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली सेवारत असलेल्या सारथी फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बालगंधर्व नाट्यमंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कर्नल एस्.के. बाबू, सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी, नायब सुभेदार विनोद कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यात एकूण ६० जणांनी रक्तदान केले, तर सिद्धीविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीने हे रक्तसंकलन करण्यात आले. या वेळी फाऊंडेशने अध्यक्ष पू. संतोष दाभाडेमाऊली आणि सचिव श्री. चेतन दाभाडे उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात रक्तदान करतांना राष्ट्रप्रेमी नागरिक

या वेळी लष्करी अधिकार्‍यांनी उपस्थितांना राष्ट्रभक्ती, परंपरा, संस्कृती यांविषयी मार्गदर्शन केले. अधिकार्‍यांनी सारथी फाऊंडेशनच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या नियोजनात संतोष कांबळे, जयहिंद गवाणकर, सचिन टाकळे, सचिन माळी, स्वाती, प्रज्ञा, ज्योती, मनस्वी, ऋतू, शालन, स्वप्नाली, सायली, सोनाली यांचा सहभाग होता.