उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवरील सुनियोजित अतिक्रमणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ?’ या विषयावर विशेष चर्चासत्र

अधिवक्ता उमेश शर्मा
श्री. मिलिंद धर्माधिकारी

पुणे – उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमीवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. धर्मांधांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या कह्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी पोलीस-प्रशासनाकडे वेळीच तक्रारी करून धर्मांधांची ही अपकृत्ये थांबवता येतील. मुसलमानांची वाढती लोकसंख्या हिंदूंसाठी आणि देशासाठी धोकादायक आहेत. आज उत्तराखंडमधील भूमी नोंदणी कार्यालयातून गेल्या १० वर्षांतील भूमी खरेदी-विक्री व्यवहार पाहिले असता ‘८० टक्के भूमी हिंदूंकडून मुसलमानांनी कह्यात घेतली आहे’, असे लक्षात येते. उत्तराखंडमधील हिंदूंच्या भूमीवरील सुनियोजित अतिक्रमणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, तसेच उत्तराखंड राज्याची सीमा ही नेपाळ आणि चीन यांना लागून असल्याने हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अतिशय धोकादायक आहे, असे रोखठोक प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र !’ या ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्रात बोलत होते.

या कार्यक्रमात ‘विश्व हिंदु परिषदे’चे उत्तराखंड राज्य उपाध्यक्ष श्री. प्रदीप मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ६ सहस्र २०० हून अधिक जणांनी पाहिला.

अधिवक्त्या अमिता सचदेवा

अधिवक्ता उमेश शर्मा यांनी मांडलेली अन्य सूत्रे

  • एका मौलवीने ‘बद्रिनाथ हे मंदिर नसून बद्रूद्दीनशहाची कबर आहे’, असे वक्तव्य केले, तसेच ते मुसलमानांच्या कह्यात देण्याची मागणी केली आहे. या वक्तव्याविरोधात कुणीही तक्रार देऊ शकतो. यावर सर्वत्र चर्चा झाली पाहिजे. तसेच वेळीच कारवाई केली पाहिजे अन्यथा ते पुढे आव्हान बनून येईल.
  • काही ठराविक राजकीय पक्ष सत्तेत येतात, तेव्हाच अशा घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडतात. त्या घडामोडींना त्या ठराविक राजकीय पक्षांचा धर्मांधांना पाठिंबा असतो.
  • जुन्या देहलीमध्येही वसाहती रिकाम्या होत असून तेथील हिंदू विस्थापित होत आहेत. या गंभीर विषयावर सर्वांनी एकत्रित होऊन कार्य केले पाहिजे. धर्मांध एखाद्या ठिकाणी जेव्हा वस्ती करण्यास प्रारंभ करतात, त्या वेळी ते पहिल्यांदा मटणाचे दुकान चालू करतात, मग शेजारची मालमत्ता खरेदी करतात. असे करत ते दुसरी, तिसरी मालमत्ता खरेदी करून पुढे सरकारी जागेवर धर्मांध अवैध बांधकामे करतात. त्याविरोधात आपण प्रारंभीच्या टप्प्यावरच तक्रार केल्यास त्याला अटकाव होऊ शकतो.

देवभूमी उत्तराखंडचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रोखायला हवे ! – प्रदीप मिश्रा, उत्तराखंड राज्य उपाध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

प्रदीप मिश्रा

१. उत्तराखंडमध्ये मुसलमानांची लोकसंख्या अल्पावधीत ४० टक्क्यांनी वाढली. ‘हरिद्वारमध्ये ५ कि.मी. क्षेत्रामध्ये मुसलमानांना रहाता येणार नाही’, असा सरकारचा आदेश आहे. हा नियम सर्वच तीर्थस्थळांना लागू केला पाहिजे. हरिद्वारमध्ये या सरकारी आदेशाचे पालन केले जात नाही. हरिद्वारमध्ये धर्मांधांची लोकसंख्या वाढत आहे. त्यांचा प्रत्येक क्षेत्रात आणि गावागावांत शिरकाव होत आहे. देवभूमी उत्तराखंडचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्याला रोखण्यासाठी हिंदु समाजाने पुढे आले पाहिजे. जे स्वत:ला हिंदु म्हणवून घेतात, त्यांनी मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि अतिक्रमण हे सरकार अन् पोलीस यांना दाखवून द्यायला हवे. सरकारनेही यामध्ये लक्ष घातले पाहिजे.

२. हिंदू निद्रिस्त होता, तेव्हा बाबरी मशीद निर्माण झाली. तो जागृत झाल्यावर राममंदिर निर्माण झाले. ही ५०० वर्षांची लढाई होती, त्यात लाखोंचे बलीदान झाले आहे. हे हिंदू जागे झाल्याचे द्योतक आहे.

३. हिंदू ‘हम दो, हमारे दो’, असे म्हणतात; पण धर्मांधांचे धोरण मात्र ‘हम दो, हमारे पच्चीस’, असे आहे. हा भेदभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात ‘समान नागरी कायदा’ करून तो कठोरपणे लागू केला पाहिजे. भारतात अल्पसंख्यांकांसाठी एक कायदा आणि हिंदूंसाठी वेगळा कायदा, हे हिंदूंसाठी पुष्कळ बाधक ठरत आहे. सर्वांसाठी समान कायदा असला पाहिजे.

४. संपूर्ण देशातील ४ लाख मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत; पण एकही मशीद सरकारच्या कह्यात नाही. विश्व हिंदु परिषदेने ‘मंदिरांना सरकारीकरणातून लवकरात लवकर मुक्त करणार’, असा संकल्प केला आहे. विश्व हिंदु परिषदेने सिद्ध करून दिल्याप्रमाणे हरिद्वारमध्ये ‘धर्मांतर कायदा’ संमत करण्यात आला आहे. त्यामुळे तेथे धर्मांतर केल्यास शिक्षा होणार.

५. हरिद्वार जिल्ह्याला ‘भीक मुक्त’ करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. हरिद्वारमध्ये जी लहान मुले भीक मागत आहेत, त्यांना एकत्र करून आश्रमशाळेत घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या बासलवाड येथे ९० बालके आश्रमात आहेत. संतांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या आश्रमामध्ये काही बालकांना आश्रय द्यावा. त्यांना हिंदु धर्म आणि परंपरा यांचे शिक्षण द्यावे. त्यातून हिंदु धर्माची नवीन पिढी सिद्ध होईल.

देवभूमी उत्तराखंडचे रक्षण करणे, हे सर्व भारतभरातील हिंदूंचे कर्तव्य ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

नरेंद्र सुर्वे

१. उत्तराखंडमध्ये केवळ हिंदूंची मंदिरे, भूमीच नव्हे, तर सरकारी आणि रेल्वे यांच्या भूमीही धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतल्या आहेत. उत्तरप्रदेशमध्ये १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करतांना पकडला गेलेला ‘उमर गौतम’ हा मूळचा उत्तराखंडमधील ‘श्याम गौतम’ होता. जिहादी धर्मांधांनी केलेल्या धर्मांतरामुळे तो कट्टर धर्मांध झाला. असे कितीतरी हिंदू हे मुसलमान झाले असतील. त्यामुळे देवभूमी उत्तराखंडचे रक्षण करणे, हे सर्व भारतभरातील हिंदूंचे कर्तव्य आहे.

२. उत्तराखंड राज्य ‘पहाडी क्षेत्र’ आणि ‘सपाट नागरी वस्ती’ या दोन क्षेत्रांत विभागले गेले आहे. पहाडी क्षेत्रातील हिंदू नोकरी, व्यवसाय, शिक्षण यांच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत. धर्मांध याचा अपलाभ घेत तेथे जाऊन भूमी, मंदिरे, सरकारी जागा कह्यात घेत आहेत. प्रथम घर, गल्ली-मोहल्ला, मशिदी, मजार (थडगे) सिद्ध करायची आणि नंतर लोकसंख्या वाढवून तेथील हिंदूंना त्रास द्यायचा. असे केल्यानंतर हिंदू आपोआप निघून जातात. उत्तराखंडमध्ये अशा प्रकारची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने याविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. त्याचसमवेत ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ सर्वत्र लागू केला पाहिजे.

३. धर्मांतराची समस्या वेळीच रोखली गेली नाही, तर काश्मीरसारखी स्थिती उत्तराखंडमध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

४. आज देशाचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात हिंदूंनी जागरूक होणे आवश्यक आहे.

५. आपल्या देशाच्या ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) व्यवस्थेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. देशाला इस्लामी राष्ट्र होण्यापासून वाचवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्याची मागणी केली पाहिजे.