गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तुमकुरू (कर्नाटक) येथील अरेयुरू गावातील (औषधांची देवता) श्री वैद्यनाथेश्वरला केला अभिषेक !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

तुमकुरू (कर्नाटक) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २३ जुलै या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अरेयुरू गावातील औषधांची देवता श्री वैद्यनाथेश्वराचे दर्शन घेऊन त्याची अभिषेकपूजा केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सकाळी ११ ते १२ या वेळेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गुरुपूजन केले. याच वेळेत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अरेयुरू येथे श्री वैद्यनाथेश्वराचे दर्शन घेऊन अभिषेकपूजा करण्यास सप्तर्षींनी सांगितले होते. त्यानुसार विधीवत् पूजन पार पडले. या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांचे शारीरिक स्वास्थ्य चांगले रहावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रातीशीघ्र व्हावी’, यासाठी प्रार्थना केली.