‘भयंकर आपत्काळातही सनातनचे साधक सुरक्षित आहेत’, याची अनुभूती येणे

‘२८.१०.२०२० या दिवशी सकाळी ६ ते ७.१५ या वेळेत झोपले असतांना मला एक स्वप्न पडले. त्या प्रसंगी ‘बाहेर लोक आरडाओरड करत आहेत आणि रडत आहेत’, असे त्यांचे आवाज ऐकून मला वाटले. त्यामुळे मी बाहेर जाऊन पाहिले, तर सर्व रस्त्यांवर माणसांची पुष्कळ प्रेते एका ओळीत पांढर्‍या कापडाने झाकून ठेवलेली दिसली. माझी दृष्टी दुसर्‍या ठिकाणी गेली, तर तेथे एक पांढर्‍या रंगाची गाय आणि छोटे काळ्या रंगाचे वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे सर्व पाहूनही मी शांत आणि स्थिर होते. त्या वेळी बाहेरची स्थिती पाहून माझ्या मनात विचार येत होते, ‘समाजातील लोकांची स्थिती किती दयनीय आहे. आपत्काळ कितीतरी भयंकर आहे, तरी गुरुदेवांच्या कृपेने आपण सनातनचे साधक किती सुरक्षित आहोत.’ त्या वेळी माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होत होती. तेव्हा ‘आपण श्री गुरूंनी सांगितलेली साधना केली, तरच ‘आपण ही परिस्थिती पाहूनही स्थिर राहू शकतो’, याची जाणीव मला झाली. हे दृश्य मला स्वप्नातच दिसत होते, तरी ‘मी हे सर्व प्रत्यक्षातच पहात आहे’, असे मला वाटत होते. मी सकाळी ७.१५ वाजता उठले, तरी माझ्या मनात कृतज्ञतेचे विचार येत होते.’

– कु. सुप्रिया आचार्य, जळगाव (३०.१०.२०२०)