जुलै २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती !

अ. एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम – ‘मी देवाचा नामजप चालू केल्यापासून मला आतून सर्वांप्रती प्रेम जाणवते, तसेच मला आतून शांत वाटत असून मनातील विचार न्यून झाले आहेत.’ – श्री. महंम्मद केशवार्झ (देश : अज्ञात)

२ आ. एस्.एस्.आर्.एफ्. लाइव्ह चॅट

२ आ १. प्रतिदिन नामजप करतांना आलेल्या अनुभूती

२ आ १ अ. स्वतःमधील ईश्‍वराशी अनुसंधान साधले जाऊन वेगळाच आनंद मिळणे : ‘मी ‘यू ट्यूब’वरील ‘ऑनलाईन’ नामजप सत्रांना उपस्थित असतो. मी या सत्रांतून जे काही शिकायला मिळते, ते कृतीत आणून ईश्‍वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी प्रतिदिन दिवसातून २ वेळा ५० मिनिटे नामजप करतो. मी काही वेळा प्रवासात नामजप करतो. मला आता काहीतरी वेगळे जाणवते. काही वेळा काही क्षण आतील ईश्‍वराशी अनुसंधान साधले जाऊन मला वेगळाच आनंद मिळतो.

२ आ १ आ. माझी नकारात्मकता नाहीशी झाली आहे. अगदी साध्या गोष्टींतूनही मला आनंद मिळतो.

२ आ १ इ. काही वेळा ‘ईश्‍वर सर्वत्र आहे’, असे जाणवून इतके शांत वाटते की, ‘मी एका पोकळीत असून घडणारे सर्वकाही केवळ पहात आहे’, असे जाणवते. ‘ही स्थिती अशीच रहावी’, असे मला वाटते.

मी काही परिपूर्ण नाही; परंतु ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत रहाणे, हेच जीवनाचे ध्येय असावे’, असे मला वाटते.’

– श्री. ल्यूक, युनायटेड किंगडम्

२ आ २. ‘यू ट्यूब’वरील ‘ऑनलाइन’ नामजप सत्रात संतांच्या समवेत नामजप करतांना निळा प्रकाश दिसून भावजागृती होणे : ‘यू ट्यूब’वरील ‘ऑनलाईन’ नामजप सत्रात संतांच्या समवेत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करतांना मला निळा प्रकाश दिसला. त्यावर लक्ष केंद्रित केल्यावर तो निळा प्रकाश माझ्यात स्थिरावला आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. माझ्यासाठी ही अत्यंत सुंदर अनुभूती होती.’ – श्रीमती हेली, टेनेसी, अमेरिका.

२ आ ३. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून आवरण काढल्यावर छातीत आणि डोके दुखायचे थांबणे अन् दिवसभर शांत वाटणे : ‘मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केला आणि आवरण काढले. माझ्या छातीत दुखायचे पूर्ण थांबले. माझे डोके जड होऊन चक्कर आल्यासारखे झाले. मी डोक्यावरील आवरण काढल्यावर माझी डोकेदुखी थांबली. मी संपूर्ण दिवसभर अगदी काम करतांनासुद्धा नामजप केला. संपूर्ण दिवस मला शांत वाटत होते. मी मीठ-पाण्याचेही उपाय करणार आहे. एस्.एस्.आर्.एफ्.ने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी सत्संगात सहभागी होण्याची माझी इच्छा आहे. तोपर्यंत मी सध्या करत असलेले प्रयत्न चालू ठेवीन.’ – श्रीमती गीता अशोक, विजयवाडा, भारत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक