सध्याच्या शिक्षणात नैतिकमूल्यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता ! – श्री श्री १००८ श्री रामदयाल दास महाराज

श्री श्री १००८ श्री रामदयाल दास महाराज

हरिद्वार, १६ एप्रिल (वार्ता.) – पूर्वीच्या काळात सनातन संस्कृतीमध्ये वडील-मुलगा यांच्यामध्ये जे संबंध होते, ते आताच्या कलियुगात राहिलेले नाहीत. आजची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने त्यांना पालकांच्या विषयी स्वतःचे कर्तव्य काय आहे, हेही कळत नाही. पुढे हीच मुले आई-वडिलांना आश्रमात सोडून परदेशात निघून जातात. सध्या मुलांचे शिक्षण केवळ पैसे कमावण्यापुरते मर्यादित राहिले असून या शिक्षणात नैतिकमूल्यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जयपूर येथील कल्याणजी मंदिर श्री सिद्ध पीठ धामचे श्री श्री १००८ श्री रामदयाल दास महाराज यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या वेळी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याविषयी निमंत्रण देण्यात आले.