आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

जॉर्ज हे केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष)चे आमदार आहेत. ते काही हिंदू नाहीत. असे असूनही त्यांना ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावा’, असे वाटते, यावरून धर्मनिरपेक्षवाल्यांनी विचार करणे आवश्यक !

पी.सी. जॉर्ज

इडुक्की (केरळ) – केरळमधील सत्ताधारी असलेला लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट आणि युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (विरोधी पक्षांची युती असलेली आघाडी) भारताला वर्ष २०३० पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी आतंकवाद्यांसमवेत काम करत आहेत. हा प्रयत्न रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे, अशी मागणी केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे आमदार पी.सी. जॉर्ज यांनी येथील थोडुपुझा येथे आयोजित एका बैठकीत केले. ‘फ्रान्सला इस्लामी राष्ट्र करण्याचा प्रयत्न आहे. इंग्लंड एक ख्रिस्ती देश आहे; मात्र तेथेही मुसलमान आक्रमण करत आहेत’, असेही ते म्हणाले.

लव्ह जिहाद आहे !

जॉर्ज म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय म्हणते लव्ह जिहाद नाही; मात्र मला ठाऊक आहे की, लव्ह जिहाद आहे. लव्ह जिहाद नष्ट करण्याचा एकच मार्ग म्हणजे महान भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे. जगरातील ६८ टक्के हिंदू समाज भारतात रहातात. जगातील अन्य देशांच्या आकड्यांवर नजर टाकली, तर प्रत्येक देश धर्मावर जोर देतो.

नोटाबंदीमुळे इस्लामी राष्ट्र करण्यास विलंब !

जॉर्ज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यानंतर भारताला इस्लामी राष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍यांना परदेशातून मिळणारा पैसा बंद झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये विलंब होत आहे.

संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर व्यवहार होतात !

भारत एक धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रधान देश आहे; मात्र या धर्मनिरेपक्ष समाजवादी देशामध्ये धर्मनिरेपक्षता वेगळी आहे. संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर व्यवहार होत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये ते अधिक आहे.