साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती

आयकर विभागाने सर्वांना ३१ मार्च २०२१ पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. आता शासनाने लिंक करण्याची मुदत वाढवली असून ती ३० जून २०२१ करण्यात आली आहे. ज्यांचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करायचे राहिले असेल, त्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करावे. ‘आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक कसे करावे ?’, याविषयीची चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये २२ मार्च २०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यांना ही प्रक्रिया करायची आहे, ते ही चौकट पाहू शकतात अथवा ‘दैनिक सनातन प्रभात’ संकेतस्थळाच्या पुढील मार्गिकेवरही ही चौकट उपलब्ध आहे : bit.ly/3rTe3by

टीप : यातील काही अक्षरे ही ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.