श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने झालेल्या रक्तदान शिबिरात १०२ धारकर्‍यांचे रक्तदान !

शिबिरात रक्तदान केलेल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देतांना श्री. आशिष लोखंडे (डावीकडून चौथे), तसेच अन्य

कोल्हापूर, ६ एप्रिल (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहरच्या वतीने ४ एप्रिलला राजाराम तरुण मंडळ, हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या शिबिरात १०२ धारकर्‍यांनी रक्तदान केले. या शिबिरात ‘अर्पण ब्लड बँक’ यांनी रक्तसंकलन केले. या प्रसंगी रक्तदान केलेल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

१. शिबिराचा प्रारंभ तोडकर संजीवनी प्रा.लि.चे संस्थापक श्री. स्वागत तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि भगवा ध्वज यांचे पूजन करण्यात आले. या वेळी श्री. सोमनाथ मुसळे, कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ धारकरी ह.भ.प. विठ्ठलराव पाटील, श्री. नितीन चव्हाण, श्री. दिपक सपाटे हे उपस्थित होते.

२. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी धर्मवीर बलीदान मासाच्या निमित्ताने प्रत्येकाने छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या त्यागाची आठवण म्हणून काहीतरी त्याग करण्याचे आवाहन केले होते. याचप्रमाणे गेल्या ४ दिवसांपासून जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याची वृत्ते प्रसिद्ध होत होती. याची नोंद घेत सामाजिक दायित्व जपत कोल्हापूर शहरातील धारकर्‍यांनी या शिबिराचे आयोजन केले.

३. कोल्हापूर शहर कार्यवाहक श्री. आशिष लोखंडे आणि कोल्हापूर शहरचे धारकरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे केले. या वेळी धारकरी सर्वश्री रोहित अतिग्रे, सुमेध पोवार, अवधूत चौगुले, गणेश जाधव, आशिष पाटील, संदेश पोलादे, दत्ता पाटील, दिनेश बामणे, कुणाल पाटील, स्वप्नील शिंदे, केदार अतिग्रे, कु. अथर्व कोल्हापूरे आदी हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.