शिवशंभो, तवकृपे सत्वर घडो युगपरिवर्तन !

श्री. महावीर श्रीश्रीमाळ

सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥ १ ॥

सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥ २ ॥

शिवशंभो, आलो तुला शरण ।
तवकृपे सत्वर घडो युगपरिवर्तन ॥ ३ ॥

११.३.२०२१ या महाशिवरात्रीच्या दिवशी देवाने सुचवलेल्या या पंक्ती श्री गुरुचरणी अर्पण !

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२१)