‘ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जन पोषण, दुष्ट निर्दालनद्वारा सत्साधन आणि सदाचाराचा प्रभावकारी जय विश्वविज्ञात होतो, तोच ‘खरा क्रोध’ होय. काळाकडे लक्ष देऊन, क्रोधाने शासन करून, युक्तीने कोणत्याही प्रकारे दुष्ट लोकांपासून स्वतःचे आणि अन्य सज्जनांचे संरक्षण करणे, हे सदाचरण होय.
तमोगुणी (आततायी) मनुष्यास योग्य शासन केल्याखेरीज तो ताळ्यावर येत नसतो. आपणास जर त्यांच्या आपत्तीपासून संरक्षण मिळवावयाचे असेल, तर आपणास प्रथम ‘क्रोधच’ संरक्षक ठरेल. अशा वेळी क्रोधामुळे आपले आणि इतरांचेही संरक्षण तात्काळ होत असते.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक, ‘श्रीधर-संदेश’, जानेवारी १९९३)