१. प्रयोगापूर्वी
‘३०.११.२०२० या दिवशी अत्यल्प, मध्यम आणि तीव्र प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्यांची प्रत्येकी १ वाटी भाजी खाण्याचा प्रयोग करण्यात आला. प्रयोगापूर्वी मला आध्यात्मिक त्रास होत असल्याने मी ४५ मिनिटे ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय केले. तरीही त्रास न्यून होत नव्हता.
२. तीव्र प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्यांची भाजी
२ अ. प्रयोगाला गेल्यावर
१. मला सकाळी १० वाजता भाजी खाण्यास दिली. भाजी खाल्ल्यावर तोंडात तिखटाची चव पुष्कळ प्रमाणात जाणवत होती; पण पाणी न पिताही केवळ ५ मिनिटांतच तिखटाची चव नाहीशी झाली.
२. मला त्रास देणार्या वाईट शक्तीचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात वाढल्यानेच तिखटाची चव पाणी न पिताही नाहीशी झाल्याचे जाणवले.
२ आ. प्रयोगानंतर : प्रयोग झाल्यानंतर मला भूक न लागल्याने विशेष जेवू शकले नाही. पुढील ३ घंटे पोटात जळजळत होते.
३. मध्यम प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्यांची भाजी
३ अ. प्रयोगाला गेल्यावर : मला दुपारी २ वाजता १ वाटी भाजी खाण्यासाठी देण्यात आली. तेव्हा पोटात अतिशय शांतता जाणवली आणि मनाला समाधानही लाभले.
३ आ. प्रयोग झाल्यानंतर : प्रयोग झाल्यानंतर थोड्याच वेळात मला पुष्कळ भूक लागल्याने मी अल्पाहार केला.
४. अत्यल्प प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्यांची भाजी
अ. मला सायंकाळी ७ वाजता १ वाटी भाजी खाण्यासाठी दिली. त्या काचर्यांचा पहिलाच घास खाताक्षणी तोंडात एकदम सात्त्विकता पसरल्याचे जाणवले.
आ. वाटीभर काचर्यांची भाजी खाऊन पूर्ण झाल्यावर मनाला समाधान वाटले. पोटातही शांतता जाणवत होती.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(३०.११.२०२०)
|