महाराष्ट्र आणि केरळ येथून जाणारे प्रवासी कोरोना निगेटिव्ह असणे आवश्यक ! – उपमुख्यमंत्री, कर्नाटक

बेळगाव – महाराष्ट्र आणि केरळ येथून कर्नाटकात येणारी कोणतीही बस थांबवली जाणार नाही; मात्र प्रवाशांचा कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आवश्यक आहे. प्रवाशांना सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे लागेल, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री  लक्ष्मण सावदी यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी घोषित केले. सांगली जिल्ह्याच्या लगत कर्नाटक सीमेवर कागवाड येथेही कर्नाटक सरकारने पडताळणी नाके उभारले आहेत. कोरोना ‘निगेटिव्ह’ असणार्‍यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.