प्रसिद्ध अभिनेते राजा नेने यांचे माघ शुक्ल पक्ष दशमी (२१.२.१९७५ या दिवशी) या दिवशी निधन झाले. त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने…
चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते अन् दिग्दर्शक गजानन हरि, म्हणजे राजा नेने !
‘१८.९.१९१२ हा राजा नेने (पू. शालिनी नेने यांचे पती) यांचा जन्मदिनांक आहे. त्यांनी आपल्या अभिनयाचा (कामाचा) आरंभ ‘प्रभात फिल्म कंपनी’पासून केला. वर्ष १९४२ मध्ये व्ही. शांताराम यांनी ‘प्रभात फिल्म कंपनी’ सोडली आणि दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी ‘रामशास्त्री’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये दिग्दर्शित केला. ‘रामशास्त्री’ हा चित्रपट अर्धा तयार झाला आणि राजा नेने यांनी नोव्हेंबर १९४३ मध्ये ‘प्रभात कंपनी’ सोडली. नंतर त्यांनी ‘पहिली तारीख’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. २१.२.१९७५ या दिवशी राजा नेने यांचे निधन झाले. आपल्या समूहातर्फे (टीप) राजा नेने यांना आदरांजली !’ – संजीव वेलणकर, पुणे (संदर्भ : माहितीजाल)
टीप – संजीव वेलणकर हे गेली अनेक वर्षे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांच्या जन्मदिनांक आणि मृत्यूच्या दिनांकांना वर्तमानपत्रातून आदरांजली अर्पण करतात. या कामासाठी त्यांना मदत करणारा जो समूह आहे, त्याचा हा उल्लेख आहे.
डोळ्यांच्या त्रासामुळे वडिलांना ‘गॉगल’ वापरावा लागणे आणि निर्मलादेवी श्रीवास्तव (माताजी) यांच्या उपचारांनी त्यांना चांगले वाटणे
‘माझे वडील नेहमी म्हणायचे, ‘‘आठवले दादांची (प.पू. बाळाजी आठवले यांची) सर्व मुले अगदी एका साच्यातून काढल्यासारखी प्रेमळ, सात्त्विक आणि हुशार आहेत.’’ – श्रीमती अनुपमा देशमुख, पुणे
माझे वडील राजा नेनेंना काही वर्षे डोळ्यांचा त्रास होत होता; म्हणून ‘गॉगल’ वापरावा लागत होता. निर्मलादेवी श्रीवास्तव म्हणजे ज्यांना ‘माताजी’ म्हणतात, त्या भक्तांना आणि शिष्यांना ‘व्हायब्रेशन्स’ द्यायच्या; म्हणून आप्पा कर्व्यांच्या सांगण्यावरून माझे वडील माताजींकडे गेले होते. त्यांना माताजींच्या ‘व्हायब्रेशन’च्या उपचारांनी पुष्कळ चांगले वाटले. ते अभिनेते असल्यामुळे कायम ‘गॉगल’ लावल्यावर त्यांना नाटकात आणि सिनेमात भूमिका करतांना मर्यादा यायच्या. त्यांनी ‘गॉगल’ लावल्यामुळे भूमिका करतांना काही ठिकाणी योग्य दिसत नव्हते. गरीब म्हातार्याची भूमिका करतांना ‘गॉगल’ लावल्यावर योग्य दिसत नव्हते. त्यामुळे त्यांना मिळणार्या भूमिकांवर मर्यादा यायला लागल्या. त्यांना माताजींच्या ‘व्हायब्रेशन’च्या उपचारांनी चांगले वाटले. (मलाही त्याचा छान अनुभव आला होता. )’
– श्रीमती अनुपमा देशमुख (पू. नेनेआजींची मुलगी), पुणे (३०.९.२०२०)
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी राजा नेने यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !‘एकदा एका कार्यक्रमात कुणीतरी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची माझ्या वडिलांशी ओळख करून दिली आणि सांगितले की, ‘ये है प्रभात फिल्म कंपनी के डायरेक्टर राजा नेने ।’ तेव्हा दिलीप कुमार त्यांना म्हणाले, ‘‘आप की रामशास्त्री फिल्म का वो गाना ‘दोन घडीचा डाव’ मुझे बहुत पसंद है ।’ – श्रीमती अनुपमा देशमुख, पुणे |