संगणकातील ज्ञानावर आवरण असणे, त्यात वाईट शक्ती साठलेली असणे किंवा ज्ञान वाचायला कठीण असणे, यामुळे ते वाचतांना त्रास होणे आणि त्यावरील उपाय

कु. मधुरा भोसले

१. ज्ञानावर आवरण आहे कि ज्ञान कठीण आहे ; म्हणून ते वाचतांना डोके जड होते ?

ज्ञानामध्ये चैतन्य असले, तर ते कठीण असूनही लवकर कळते. जेव्हा ज्ञानामध्ये वाईट शक्ती साठवलेली असते किंवा त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते, तेव्हा सोप्या भाषेतील ज्ञान वाचतांनाही त्रास होतो आणि त्याचे आकलन होत नाही. एखाद्या धारिकेतील ज्ञानामध्ये वाईट शक्ती साठलेली असल्यामुळे ते वाचतांना डोके जड होते.

२. संगणकातील ज्ञानावर आवरण असल्यास किंवा ज्ञान कठीण असल्यास हाताचा तळवा जवळ आणतांना तो अर्धा ते पाऊण मीटर अंतरावर असतांना त्रास जाणवणे

स्क्रीनपासून अर्धा ते पाऊण मीटर अंतरावर हाताचा पंजा आणल्यावर त्रास जाणवतो आणि पंजा मागे ढकलल्याप्रमाणे जाणवतो, तसेच तळव्याला स्क्रीनकडून येणारी उष्ण आणि काटेरी स्पंदने जाणवतात.

३. वाचण्याच्या त्रासावर लगेच करता येण्यासारखा उपाय

ज्ञानामध्ये साठलेली वाईट शक्ती ही निर्गुण-सगुण स्तरावरील आहे. त्यामुळे ती त्वरित नष्ट होत नाही. यासाठी अशा धारिकांच्या लिखाणामध्ये ‘॥ श्री हनुमते नम: ॥’ हा नामजप लिहून धारिका संगणकात संरक्षित करून ठेवाव्यात. १ मासानंतर (महिन्यानंतर) या धारिका उघडून पहाव्यात. जर वाईट शक्ती न्यून झाली नसेल, तर पुन्हा धारिका संगणकात संरक्षित करून ठेवावी. असे प्रत्येक मासानंतर पाहिल्यास धारिकेतील वाईट शक्ती न्यून झालेली आहे कि नाही हे पहावे. जेव्हा धारिकेतील त्रासदायक शक्ती पूर्णपणे न्यून झालेली असेल, म्हणजे १० टक्क्यांपेक्षा अल्प झालेली असेल, तेव्हा धारिका पडताळावी.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.