१३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी वीर उमाजी नाईक यांचा बलीदानदिन आहे. यानिमित्ताने…
‘भारतीय समाजात हलक्या समजल्या जाणार्या, गुन्हेगार मानले गेलेल्या रामोशांसारख्या जमातीत जन्मलेल्या एका माणसाने (उमाजी नाईक यांनी)‘आम्ही चोर नाही, बंडखोर आहोत’, असा खणखणीत निरोप इंग्रजांना पाठवावा आणि एका देशव्यापी क्रांतीचे स्वप्न पहावे अन् त्यासाठी आमरण झटावे, ही देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातसुद्धा एक हुरहूर लावणारी घटना घडून गेली, असे जाणवल्याविना रहात नाही.’ – सुधाताई धामणकर (‘सदाचार आणि संस्कृती मासिक’, ऑगस्ट २००८)