वैराग्य वसंता येता बहर ।
अहं ब्रह्मरूप येतो अमूप मोहोर ॥ १ ॥
न जाता आता फार काळ ।
ब्रह्मप्राप्ती रूप आले फळ ॥ २ ॥
बुद्धीचिया पोटी आली विरक्ती ।
संसार परमार्थाची गेली आसक्ती ॥ ३ ॥
चालता पाऊल पुढे तेथे मोक्ष खाण ।
न पडे मग कशाचीच वाण ॥ ४ ॥
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (१८.८.२०२०)