‘पुणे येथील साधिका सौ. मनीषा पाठक यांनी ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘आपले ओझे न्यून करायचे आहे आणि सर्व जुने प्रसंग अन् पूर्वग्रह काढायचे आहेत’, असे सांगितल्यावर मला पुढील कविता सुचली.
मनावरील मळभ काढायचे आहे ।
गुरूंना शरण जायचे आहे ॥ १ ॥
भूतकाळाचे प्रसंग विसरायचे आहेत ।
वर्तमानकाळात निरंतर रहायचे आहे ॥ २ ॥
आपुले आपण हसायचे आहे ।
देवाचे लाडके बनायचे आहे ॥ ३ ॥
जन्मोजन्मीचे संस्कार घालवायचे आहेत ।
स्वभावदोष-अहं निर्मूलन करून मनाला घडवायचे आहे ॥ ४ ॥
खरा मी कोण आहे, हे शोधायचे आहे ।
जिवाला शिवाशी भेटवायचे आहे ॥ ५ ॥
अस्तित्व आपुले विसरायचे आहे ।
गुरुचरणी एकरूप व्हायचे आहे ॥ ६ ॥’
– सौ. कविता बेलसरे, पुणे (मे २०२०)
‘कोरोना’ने मला शिकवले काय ?
‘कोरोना’ने मला शिकवले काय ।
देवाविना कुणी कुणाचे नाय ॥ १ ॥
वेळेची किंमत शिकवली ।
आयुष्याची किंमत कळली ॥ २ ॥
स्वावलंबन अन् काटकसर करायला शिकवले ।
तत्परता अन् सावधानता शिकवली ॥ ३ ॥
‘कोरोना’ने अंतर्मुख व्हायला लावले ।
आपले कुठे चुकते, ते शोधायला लावले ॥ ४ ॥
गुरूंची दूरदृष्टी लक्षात आणून दिली ।
साधकांकडून नामजपादी व्यष्टी साधना करवून घेतली ॥ ५ ॥
स्वभावदोष-अहं निर्मूलन करायला शिकवले ।
साधनेचे महत्त्व पटवून गुरूंचे श्रेष्ठत्व लक्षात आणून दिले ॥ ६ ॥
मनाला मायेतून सोडवले ।
ईश्वराशी अनुसंधान ठेवायला शिकवले ॥ ७ ॥
– सौ. कविता बेलसरे, पुणे (मे २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |