‘बाहेरचे लोक कितीतरी पैसा मोठ्या प्रमाणात व्यय (खर्च) करून, स्वत:चा वेळ व्यय (खर्च) आणि एवढे सायास करून आपल्या देशात येतात, तेव्हा त्यांच्या मनात निश्चितच आपल्या देशाविषयी, येथील लोकांविषयी, इथल्या वैशिष्ट्यांविषयी काही जाणण्याची, शिकून घेण्याची इच्छा असणारच. देश आणि देशाचे सृष्टीसौंदर्य पहाण्याची त्यांची इच्छा, तर कशा ना कशा प्रकारे पूर्ण होत असते; पण देशाविषयी जाणून घेण्याची, काही शिकण्याची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकत नाही.
(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योती’, सप्टेंबर २०१२)