महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मनुस्मृतीमध्ये सांगितलेली शिक्षा

पुमांसं दाहयेत् पापं शयने तप्त आयसे ।
अभ्यादध्युश्‍च काष्ठानि तत्र दह्येत पापकृत् ॥

– मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक ३७२

अर्थ : परस्त्रीगमन करणार्‍या पापी पुरुषाला तप्त लोखंडी पलंगावर झोपवून लाकडी ओंडक्यांनी तो मरेपर्यंत भाजावे. मनुस्मृतीनुसार बलात्कार करणार्‍याला लोखंडी तप्त सळीने जाळले पाहिजे, त्याला जाळून ठार केले पाहिजे आणि ही शिक्षा राजाने लवकरात लवकर कार्यवाहीत आणली पाहिजे. राजा व्यस्त असल्यास ही शिक्षा समाजातील कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडून द्यावी.