मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या संदर्भात आमदार बाबुश मोन्सेरात यांनी भूमिका पालटली !

पणजी, २५ जानेवारी (वार्ता.) – मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या संदर्भात स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांनी त्यांच्या भूमिकेत पालट केला आहे. आमदार बाबुश मोन्सेरात म्हणाले, मांडवीतून तरंगते कॅसिनो अन्यत्र नेल्यास पणजी शहरातील व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. पणजीवासियांनी मांडवीतील तरंगते कॅसिनो अन्यत्र स्थलांतर करण्याची मागणी कधीच केलेली नाही. शहरातील व्यावसायिकांना तरंगते कॅसिनो मांडवीत असलेले हवेत. (स्वतःचा लाभ पहाणार्या या व्यावसायिकांच्या कुटुंबातील व्यक्ती कॅसिनोतील जुगाराच्या नादी लागली की, हे व्यावसायिक जागे होणार का ? स्वतःआधी राष्ट्राचा आणि समाजाचा विचार न करणारा समाज गुलामगिरीत जातो, हे लक्षात घ्यावे ! – संपादक)
बाबुश मोन्सेरात यांनी मागे झालेल्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्यास १०० दिवसांत मांडवीतील तरंगते कॅसिनो अन्यत्र स्थलांतर करण्याचे आश्वासन पणजीवासियांना दिले होते. (आता मोन्सेरात मतदारांपेक्षा पणजीतील व्यावसायिकांचा विचार करू लागले आहेत, हे ओळखा ! – संपादक)
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह