भंडारा आग प्रकरणाचा अहवाल लवकरच येईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

भंंडारा येथील उपजिल्हा रुग्णालयाला आग लागल्याचे प्रकरण

पत्रकारांशी बोलतांना राजेश टोपे

मुंबई – ८ जानेवारी या दिवशी रात्री २ वाजता भंडारा उपजिल्हा रुग्णालयात शॉटसर्किटने लागलेल्या आगीचा लवकरच अहवाल येण्याची शक्यता आहे; मात्र हा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आवश्यकता भासल्यास मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २० जानेवारी या दिवशी दिली. ते राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले की, भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाचा अहवाल अजून आमच्या विभागाचे सचिव आणि आयुक्त यांच्यापर्यंत आलेला नाही. या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभाग स्तरावर केली जाईल. त्यानुसार अहवालाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईलच यात शंका नाही; मात्र ही सगळी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण ताकतीने प्रयत्नशील राहू.