अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता

सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – कराड तालुक्यातील सैदापूर येथील ‘मिलिटरी होस्टेल’जवळ सासवे कुटुंबीय वास्तव्यास आहे. याच कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचा १८ डिसेंबरच्या पहाटे उलट्या आणि जुलाब होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. १७ डिसेंबरला रात्री एकत्र भोजन करून सर्वजण झोपी गेले; मात्र मध्यरात्री १.३० वाजता आई आणि मुलींना उलट्या अन् जुलाबाचा त्रास होऊ लागला. यातील मुलींना त्रास असह्य झाल्याने त्यांना कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तोपर्यंत तीनही मुलींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक तर्क व्यक्त केला आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !