सहस्रावधी कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी रहाण्याला कोणाचे दायित्व आहे, हे जनतेला समजले पाहिजे आणि त्यांच्याकडून ही थकबाकी भरून घेतली पाहिजे.
सातारा, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – सरकारवर टीका करणे हा भाजपचा बुद्धीभेद आहे. मागील ५ वर्षांत राज्यात वीज महामंडळाची ६७ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीज महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.