मराठी राजभाषा निर्धार समितीच्या विभाग प्रमुखांची बैठक

फोंडा, ७ जून (पत्रक) – म्हापसा, मडगाव, फोंडा आणि पणजी अशा झालेल्या यशस्वी सार्वजनिक सभांच्या पार्श्वभूमीवर मराठी राजभाषा निर्धार समितीच्या १८ प्रखंडांतील (प्रखंड हे समितीने ठरवलेले राज्यातील भाग) प्रमुख १४० कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक फोंडा येथील थ्रिफ्ट सहकारी सोसायटी सभागृहात ६ जूनला झाली. प्रमुख मार्गदर्शक श्री. गो.रा. ढवळीकर, राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर, केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य आणि भारतमाता की जय संघाचे राज्यसंघचालक डॉ. गोविंद देव, राज्य मराठी-मातृशक्तीप्रमुख प्रा. (डॉ.) अनिता तिळवे अन् मराठी युवाशक्ती केंद्रीय राज्य प्रभारी (तात्पुरता कार्यभार सांभाळणारे) श्री. नितीन फळदेसाई यांचे मार्गदर्शन या बैठकीस लाभले.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय !
१. संभाव्य पावसाळी विधानसभा अधिवेशनात मराठीला (कोकणीबरोबरच) दुसरी राजभाषा म्हणून घोषित करणारी दुरुस्ती सरकारने गोवा राजभाषा कायद्यात संमत करून घ्यावी लागेल, असा ठराव घेण्यात आला.
२. वरील मागणी पूर्ण न केल्यास मराठीप्रेमींना सरकारच्या विरोधात उभे करण्याचे संपूर्ण दायित्व सरकारचे राहील.
३. मराठी राजभाषेच्या विषयात जनसामान्यांना सहभागी करून घेण्यासाठी ५ लाख स्वाक्षर्या गोळा करण्याचे लक्ष्य ठेवून चालू करण्यात आलेले ‘स्वाक्षरी अभियान’ पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२६ असा निश्चित करण्यात आला. जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात स्वाक्षर्यांचे निवेदन राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना सादर करावे, असे ठरले.
४. विविध क्षेत्रांत नाव कमवलेले समाजमान्य प्रभावी प्रतिष्ठित मराठीप्रेमी नागरिकांच्या ‘मराठी सद्भावना बैठका’ प्रखंड स्तरावर जुलै महिन्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
५. आतापर्यंत मराठी राजभाषा आंदोलनाला मिळालेला लोकाश्रय व्यापक करण्यासाठी सर्व प्रकारच्या मराठी संस्था, क्लब्स, भजनी मंडळे, वारकरी संप्रदाय, महिला मंडळे, सांस्कृतिक आणि धार्मिक/आध्यात्मिक पंथ-संप्रदाय आदी संस्था, तसेच ग्रामपंचायती यांच्या पाठिंब्याचे ठराव प्राप्त करण्याची मोहीम ऑगस्टमध्ये राबवण्याचा निर्णय झाला.
‘मराठी असे आमुची प्रिय माता, तिचे गुण गाता सरे शब्दसरिता’, या सांघिक मराठी-गौरव गीताने बैठकीचा प्रारंभ झाला. बैठकीचे संपूर्ण संचालन निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. समारोप मार्गदर्शक श्री. गो.रा. ढवळीकर यांनी केला. सामूहिक पसायदानाने बैठकीची सांगता झाली.
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद