जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाता कामा नये ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

शाळा, महाविद्यालयीन प्रवेशाविषयी शिक्षण विभागाची आढावा बैठक

आढावा बैठकीत बोलतांना शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, तसेच उपस्थित अधिकारी

कोल्हापूर – राज्यशासनाच्या निर्देशानुसार चालू असलेली प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आणि विद्यार्थी अन् पालक यांची फसवणूक किंवा लूट होऊ न देण्याचे दायित्व शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे आहे. अतिरिक्त शुल्क, इमारत निधी, शालेय साहित्यांच्या माध्यमातून पालकांची लूट खपवून घेणार नाही. विनादेणगी पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहाता कामा नये, अशा सूचना ‘राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. शाळा-महाविद्यालयीन प्रवेशाविषयी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.