६५ लाखांची रक्कम आणि ५१ शस्त्रे जप्त !

गडचिरोली – जिल्ह्यातील माओवादी चळवळ समूळ नष्ट करण्याच्या दिशेने गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत सुरक्षादलांनी ८ जहाल माओवाद्यांना अटक केली. या देशद्रोही माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर जीवघेणा शस्त्रसाठा आणि ६५ लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ७ फेब्रुवारी २०२६ या दिवशी फोदेवाडा अरण्य परिसरात झालेल्या चकमकीत ‘सी-६०’च्या एका सैनिकाची हत्या करणार्या मुख्य नराधमांचाही समावेश आहे. ‘या यशस्वी कारवाईनंतर आता गडचिरोली पोलिसांच्या दप्तरी (अभिलेखावर) एकही सक्रीय माओवादी शिल्लक नाही’, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या ८ देशघातकी माओवाद्यांवर एकूण ६४ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !