
पुणे – ‘राष्ट्रीय महिला आयोगा’ने भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची नोंद घेतली असून महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. असे गुन्हे म्हणजे मुलांच्या हक्कांचे होणारे उल्लंघन आहे. समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवर असे प्रसंग प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आयोगाने या अमानवीय कृत्याचा निषेध केला आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला त्वरित साहाय्य आणि हानीभरपाई देणे, पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत आरोपपत्र नोंद करणे, जलद गती न्यायालयात वेगाने घटना चालवणे यांवर आयोगाने भर दिला आहे. प्रत्येक मुलीची सुरक्षा आणि न्याय निश्चित करण्याला प्राधान्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक