
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाने स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशांनी तिकिटावर ‘स्वच्छता अधिभार’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रवाशांकडून २ रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत. हा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरला जाईल. त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या योजनेअंतर्गत १ जूनपासून एस्.टी. स्थानकांवरील सर्व शौचालये प्रवाशांसाठी विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानकाची ४ घंट्यांनी स्वच्छता करणे बंधनकारक आहे. बससेवा चालू होण्यापूर्वी प्रत्येक बस आतून आणि बाहेरून स्वच्छ असल्याची निश्चिती कंत्राटदारांना करावी लागेल. प्रत्येक प्रमुख स्थानकावर वाचनालय उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. १ जून या दिवशी महामंडळाचा वर्धापनदिनही आहे.
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !