
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळूच्या अवैध वाहतुकीच्या विरोधातील तक्रारींची गंभीर नोंद घेऊन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने १७ एप्रिलच्या रात्री विविध तालुक्यांत संयुक्त पथके सिद्ध करून वाळूची अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर अनेक ठिकाणी कारवाई केली. या वेळी वाळूची वाहतूक करणारी १५ वाहने कह्यात घेण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळूची अवैध वाहतूक करणार्यांनी वाहनातील वाळू अन्यत्र टाकून पलायन केले.
या कारवाईच्या वेळी आचरा–कणकवली मार्गावर २ वाहने, देवली-परूळे मार्गावर ३ वाहने, कुंभारमाठ येथे ३ वाहने, तोंडवली येथे ३ वाहने आणि कुडाळ परिसरात ४ वाहने, अशी एकूण १५ वाहने कह्यात घेतली. ही सर्व वाहने संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान