देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्मयोद्धे बना ! – श्रीकृष्ण नारकर

हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ उपक्रमांतर्गत ‘हर घर योद्धा’ अभियान

मार्गदर्शन करतांना श्री. श्रीकृष्ण नारकर (उजवीकडे) आणि शेजारी गोपीचंद कारेकर

पाचल (राजापूर), १० एप्रिल (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत प्रारंभ झालेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाला जिल्ह्यात युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या रक्षणासाठी न करता देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी करा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकृष्ण नारकर यांनी केले.

रायपाटण येथील श्री. अशोक शेट्ये यांच्या निवासस्थानी समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमांतर्गत चालू असलेल्या १० दिवसांच्या ‘हर घर योद्धा’ अभियानाच्या तिसर्‍या दिवशी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

श्री. श्रीकृष्ण नारकर पुढे म्हणाले की, देव, देश आणि धर्म यांचे आपल्यावर पुष्कळ ऋण आहे. ते ऋण फेडणे हे आपले कर्तव्यच आहे. सध्याच्या आपत्काळात देव, देश आणि धर्म यांसाठी आपण संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ होईल. त्याचा परिणाम म्हणून हिंदूंच्या सर्व समस्यांवर उपाय असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना संतांच्या संकल्पाने होणार आहे आणि त्यायोगे आपला उद्धारही होणार आहे.
या वेळी सर्वच प्रशिक्षणार्थींनी वर्गाचा पुष्कळ लाभ होत असल्याचे सांगितले.