तेहरान (इराण) येथे पाकच्या दूतावासाजवळ आक्रमण केल्यावरून पाकची इस्रायलला पोकळ धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – इस्रायलच्या सैन्याने २७ मार्चला इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमणे केली. या आक्रमणांचा परिणाम तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ असलेल्या इमारतींवरही झाला. या घटनेनंतर पाकिस्तान सरकारशी संबंधित ‘पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरम’ने ‘पाकिस्तान म्हणजे कतार नाही, हे इस्रायलने लक्षात ठेवावे. जगाच्या कोणत्याही कोपर्यात आमच्या राजनैतिक अधिकार्यांना दुखापत झाली, तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी दिली. विशेष म्हणजे या आक्रमणांत पाकिस्तानी दूतावास अथवा तेथील कर्मचारी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चा पाकिस्तानच्या मध्यस्थीने चालू आहे. अमेरिकेने दिलेला १५ कलमी प्रस्ताव सध्या इराणच्या विचाराधीन आहे.
संपादकीय भूमिकाइस्रायलने पाकच्या दूतावासावर आक्रमण करावेच, म्हणजे पाक तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे काही करू शकत नाही, हे जगाला समजेल ! |
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत