(यू ट्यूबर म्हणजे स्वतःच्या यू ट्यूब वाहिनीद्वारे व्हिडिओ अपलोड करणारी व्यक्ती)

ओंटारियो (कॅनडा) – येथे खलिस्तानचा विरोध करणार्या पंजाबी वंशाच्या ४५ वर्षांच्या नॅन्सी ग्रेवाल यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना ३ मार्चच्या रात्री घडली. नॅन्सी ग्रेवाल या यू ट्यूबर होत्या आणि सामाजिक माध्यमांवर अत्यंत सक्रीय होत्या. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर नॅन्सी ग्रेवाल या गंभीर घायाळ अवस्थेत त्यांना आढळल्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. पोलीस हत्येचे अन्वेषण करत आहेत.
Anti-Khalistan Punjabi YouTuber Nancy Grewal has been murdered in Canada.
This comes at a time when Canadian PM Mark Carney is visiting India to sign a key agreement and signalling cooperation with India against Khalistani extremism.
The timing raises serious questions.
Was… pic.twitter.com/4ax8bcu6YT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2026
नॅन्सी ग्रेवाल कोण होत्या ?
नॅन्सी ग्रेवाल या सामाजिक माध्यमांवर पंजाबशी संबंधित विषयांवर स्पष्टपणे मते मांडत असत. त्यांनी यापूर्वी खलिस्तानी आतंकवादी अमृतपाल सिंह, राजकीय नेते बिक्रम सिंह मजीठिया आणि ‘डेरा ब्यास’ संप्रदायाशी संबंधित गुरिंदर सिंह ढिल्लों यांच्याविषयीही भाष्य केले होते. याखेरीज त्या खलिस्तान समर्थकांवर टीका करत आणि भारत-कॅनडा तणावासारख्या विषयांवरही भूमिका व्यक्त करत असत.
संपादकीय भूमिकाकॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारतात येऊन करार करतात आणि खलिस्तानविरोधात भारतासमवेत सहकार्य करण्याची एकाअर्थी भूमिका घेतात. त्यामुळेच कॅनडातील खलिस्तानींनी ही हत्या केल्याची शक्यता अधिक आहे, असेच लक्षात येते ! |
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !
Trump Tariff : ट्रम्प भारतासह अनेक देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादणार