अमेरिका, इस्रायल-इराण युद्धाची मध्यपूर्व आशियात झळ

पणजी, १ मार्च (वार्ता.) – सहस्रो गोमंतकीय तरुण नोकरीच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधील भीषण संघर्षाची आखाती देशांना झळ सोसावी लागत आहे. सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती येथील अमेरिकेच्या तळांवर इराण क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करत आहे आणि त्या ठिकाणी धोक्याचे सायरन वाजवले जात आहेत. यामुळे तेथील गोमंतकीय समुदाय आणि त्यांचे गोव्यातील कुटुंबीय यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. कुवेतमध्ये रहाणार्या अनेकांच्या मनामध्ये वर्ष १९९० च्या इराकी आक्रमणाच्या भयाण आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्व आशियातील आकाशक्षेत्र बंद करण्यात आले आहे. विमान उड्डाणे रहित झाल्याने प्रवासांचे वेळापत्रक खोळंबले आहे. कतार येथे मोठ्या प्रमाणात गोमंतकीय वास्तव्यास आहेत. कतार येथे २८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी इराणने क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले होते, तेव्हा तेथील भारतीय दूतावासाने तेथील भारतियांना सावधगिरी बाळगण्याचा संदेश अनेक वेळा पाठवला होता. भारतियांसाठी तेथे २४ घंटे हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे, तसेच ईमेल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. गोव्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक माध्यमांतून आखातातील गोमंतकीय नागरिकांच्या हितासाठी पावले उचलण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
गोव्यातून दुबई आणि बहरीन येथे विमान उड्डाणे रहित
पणजी – मध्यपूर्व आशियामध्ये असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम गोव्यातील विमान वाहतुकीवरही झाला आहे. गेल्या २ दिवसांत गोव्यातून दुबई आणि बहरीन येथे विमान उड्डाणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रहित करण्यात आली आहेत. विमानतळ प्रशासनाने यासंबंधी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या आहेत.
दाबोळी येथून ‘एअर इंडिया एक्सप्रेस’चे गोवा-दुबई विमान २८ फेब्रुवारी या दिवशी, तर १ मार्च या दिवशी दुबई-गोवा विमान रहित करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘गल्फ एअर’चे १ मार्च या दिवशीचे बहरीन-गोवा-बहरीन विमान रहित करण्यात आले. मोपा विमानतळ प्रशासनाने ‘प्रवाशांता विमानोड्डाणाची स्थिती पडताळूनच विमानतळावर यावे आणि विमानतळावर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका ! – काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा
काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि गोमंतकीय नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !