रस्ते खोदणे आणि बुजवणे ही कामे वेळेत अन् योग्य पद्धतीने करण्याचा पुणे पालिकेचा आदेश !

खोदण्याची कामे अनुमतीनुसार, तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार झाली नाहीत, तसेच खोदल्यानंतर रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याचे पहाणीमध्ये आढळले नाही, तर संबंधित पथ विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यावर कारवाई केली जाणार आहे.

पुणे येथील ससूनच्या अधिकार्‍याच्या विरोधात राज्य माहिती आयोगाची शिस्तभंगाची कारवाई !

माहिती लपवणे आणि खोटी माहिती पुरवल्याचे प्रकरण !

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

महापालिका आयुक्त तसेच प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ सहस्र ६०१  कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या…

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत !

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २ टप्प्यांमध्ये झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांच्या कामांचे १७५ पेक्षा अधिक प्रस्ताव संमत करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले !

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. १५ मार्च या दिवशी त्यांनी मावळते आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

पुणे महापालिकेमध्ये भरती केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणार ! – उपायुक्त महेश पाटील यांचे आदेश

काही उमेदवारांनी त्यांचे शिक्षण चालू असतांना पदवी घेतली, त्याच वेळी कामही केले, असा दाखला दिलेला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याने उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा अर्ज फेटाळला !

शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करतांना नदीची वाहन क्षमता अल्प होता कामा नये. नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, तसेच पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याची काळजी घ्यावी.

जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून ४३ कोटींचा निधी उपलब्ध !

राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून राज्य शासनाने तो वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

पुणे येथील कसबा पेठेतील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा उफाळला !

८ मार्चला मध्यरात्री दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. ‘ही अफवा आहे, दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नाही’, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर जमाव शांत झाला

पुणे महानगरपालिकेने दिलेल्या अधिकृत परवान्याचा दुरुपयोग करून धर्मांधांची पुणे येथे अवैधरित्या गोमांस विक्री !

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे.याची पोलीस आणि प्रशासन यांनी नोंद घेऊन कठोर उपाययोजना करणे अपेक्षित !