पुणे येथे रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्यूब घाटात टाकणार्‍या आस्थापनाला १ लाख रुपयांचा दंड !

रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित रक्ताच्या नमुन्यांच्या ट्यूब जुन्या कात्रज घाटात टाकून देणार्‍या एन्.एम्. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक आस्थापनावर महापालिकेने कारवाई केली आहे.

पुणे शहरात तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण; हवामानशास्त्र विभागाकडून ‘यलो अलर्ट’ !

यंदा मार्चच्या अखेरपासून पार्‍याने ४० शी पार केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शहरातील अनधिकृत, धोकादायक फलक हटवण्याचे ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडून आवाहन !

यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, ‘बोर्ड’, कापडी फलक, फ्लेक्स धारक यांनी अनुमती घेण्यासाठी विकास परवानगी विभागाकडे एकूण १७६ प्रकरणे प्रविष्ट (दाखल) केली आहेत,

पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !

पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !

रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !

याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे !

स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्याची पुणे महानगरपालिकेची विनंती !

शहरातील स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. स्मशानभूमीसाठी वायू प्रदूषणाचे नियम नसल्याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

लोकसभा मतदानदिनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार ?

पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्याकरता पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १२ आणि १३ मे या दोन्ही दिवशी निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे.

अधिकचे पाणी घेऊनही पुणे शहरांतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पाण्याच्या मूलभूत समस्येसाठी नागरिकांना खर्च करावे लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

पुणे येथील १०० खासगी रुग्णालयांचे परवाना नूतनीकरणच नाही !

रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणचे परवाना नूतनीकरण न हाेणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्यासारखेच आहे !

पुणे येथे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले !

शहरातील उपनगर रामटेकडी भागात पाण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडले.