कहां फेके कचरा…?

प्रतिदिन ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’, असे गाणे ऐकवणार्‍या कचरा गाडीने जनतेला स्वच्छतेच्या दृष्टीने बर्‍याच चांगल्या सवयी लावल्या. कचरा इतरत्र फेकू नये, सुका आणि ओला कचरा निराळा करून ठेवावा इत्यादी; पण ही गाडी आता सामान्यांना त्रास देऊ लागली आहे, असे नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून लक्षात येते.

प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !   

जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !

सेलिब्रेटींचा पोरखेळ !

भरकटलेल्‍या तरुणाईला योग्‍य वाट दाखवण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे यांचा पाया निर्माण करायला हवा, तसेच सेलिब्रेटींच्‍या कृतींचा आदर्श ठेवायचा का ? हेही तरुणाईने ठरवायला हवे !

पाणी अडवा, पाणी जिरवा !

सध्या उन्हाळा असल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. उष्माघाताने अनेकांचा जीव जात आहे. धरणीचे तापमान प्रचंड वाढत आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. निसर्गाच्या या प्रकोपाला कसे शांत करता येईल ?

स्वच्छतागृह ठेकेदारांची ‘दादागिरी’ का ?

राज्यातील महिलांच्या सन्मानार्थ एस्.टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकांवर महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र या परिस्थितीचा अपलाभ काही ठिकाणी घेतला जात आहे.

न मे भक्‍तः प्रणश्‍यति !

जळगाव जिल्‍ह्यासह राज्‍यात अवेळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवेळी पावसासह वादळी वारे आणि गारपीट यांमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे.

‘बेस्‍ट’ निर्णय !

फक्‍त ‘बेस्‍ट’च नाही, तर शासनाचे सर्व उपक्रम आणि कार्यालये यांमध्‍ये ‘भ्रमणभाष’ वापराच्‍या संबंधित नियमावली लागू करणे आवश्‍यक झाले आहे. यामधून सर्वांचा अमूल्‍य वेळ तर वाचेल आणि स्‍वयंशिस्‍तही लागेल.

जिवावर बेतलेले ‘अनधिकृत’ होर्डिंग !

कात्रज-देहूरोड (पुणे) बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्‍हरब्रीज सर्व्‍हिस रस्‍त्‍यावर वादळी वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्‍या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्‍यू झाला. अचानक सोसायट्याचा वारा आल्‍याने किवळे येथे एका बांधकाम साईटवर काम करणारे कामगार एका पंक्चरच्‍या दुकानामध्‍ये आडोशाला थांबले होते.

प्रसिद्धीचा हव्यास ?

एका मराठी अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या वैयक्तिक क्षणांविषयी केलेले एक विधान चांगलेच गाजत आहे. ‘त्यांचे वैयक्तिक क्षण आम्ही पाहिलेले आहेत’, असे तिने म्हटले. खरेतर कुणीही आपल्या आई-वडिलांच्या संदर्भात अशा विषयांवर उघडपणे वाच्यता करत नाही. याला कारण ‘संस्कृती’ आणि ‘नैतिकता’ आहे.

‘पर्यावरण असमतोल’ कुणामुळे ?

तापमान वाढीला ‘आधुनिक जीवनशैली’ कारणीभूत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून समाजाचे प्रबोधन करणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मानवाची विनाशाकडे वाटचाल होईल हे नक्की !