ऋषिमुनींची ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा !

ऋषिमुनींची ‘कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजेेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा ! हिंदूंनो, सन्मानाने जगायचे असेल, तर स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि हिंदु धर्माचा प्रसार, हिंदुजागृती अन् धर्मरक्षण हा मार्ग अवलंबण्याची शपथ घ्या !   

हिंदूंनो, स्वधर्म जाणून धर्माभिमान जोपासा ! 

धर्मश्रद्धांवरील आक्रमणांचा प्रतिकार करून स्वतःचा वंश वाचवला पाहिजे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्म टिकल्यासच आपण टिकणार आहोत. हिंदूंनो, धर्माचरण करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि त्यासाठी अवतारी कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

विश्‍वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय.

संस्कृतीरक्षण आणि धर्माचरण यांसाठी धर्मशिक्षणाचा प्रसार आवश्यक असल्याने त्यादृष्टीने कार्य करणारी हिदु जनजागृती समिती !

धर्महानी किंवा वाढते पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण याला हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे आणि त्यांचा धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित करते.

हिंदूंनो, ‘योग्य धर्मशिक्षण मिळून धर्माचरण केल्यास तुमच्याकडे वक्रदृष्टी करून पहाण्यास कुणी धजावणार नाही’, हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करा !

मुसलमान, पारशी इत्यादी पंथियांनी त्यांची संस्कृती जपण्याचा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला आहे आणि करतही आहेत. याउलट हिंदू मात्र त्यांच्या संस्कृतीपासून दूर चालले आहेत. ‘हिंदूंना योग्य धर्मशिक्षण मिळून त्यांच्याकडून धर्माचरण झाल्यास त्यांच्याकडे वक्रदृष्टी करून पहाण्यास कुणी धजावणार नाही’,

हिंदूंनो, जीवनाचे अध्यात्मीकरण करण्यासाठी हे टाळा आणि हे करा !

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय. हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचार हा सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारा आहे.

हिंदुत्व म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात केलेले कर्म !

‘नुसत्या हिंदुत्वाला काही अर्थ नाही. तेथे धर्म असायला हवा. ईश्‍वरी अधिष्ठानाविना धर्म रुजत नाही. हिंदुत्व म्हणजेच धर्माचरण, म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात केलेले कर्म.

स्वभावदोष-निर्मूलनाच्या दृष्टीकोनातून धर्मपालनाचे महत्त्व

षड्रिपू हे नैसर्गिक असल्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे शक्य नसले, तरी समाजव्यवस्था उत्तम रहावी, यासाठी ते धार्मिक आणि नैतिक संस्कारांनी आत्मनियंत्रणात ठेवता येतात. नैतिक मूल्ये आणि धर्म यांचे पालन केल्यामुळे समाजातील सर्वच घटकांमधील षड्रिपू नियंत्रित रहातात. त्यामुळे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे शक्य होते.

हिंदूंनो, धर्माचरणासाठी हे कराच !

‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ  धर्माचरणात आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजा-अर्चा,  सण आणि उत्सव हे शास्त्र समजून घेऊन करणे, तसेच कुलाचार अन् कुलपरंपरा सांभाळणे, यालाच  ‘धर्माचरण’ असे म्हणतात.

हिंदु स्त्रियांनो, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून स्वतःचे रक्षण स्वतःच करा !

सुशिक्षित मुलींच्या ‘तोकडे कपडे घालणे आणि पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे हेच स्वातंत्र्य अन् प्रगती आहे’, अशी विचारसरणी बलात्कारासारख्या घटना घडण्यासाठी कारणीभूत असते. हिंदूंनी धर्माचरण केले आणि स्त्रियांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले, तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.