संस्कृतला राष्ट्रभाषा घोषित करा !

बूंदी (राजस्थान) येथे काही धर्मांधांनी एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिकेला तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू भाषेचा समावेश करण्याची धमकी देत ‘असे न केल्यास शाळेला टाळे ठोकणार’, अशी धमकी दिली.

असे घडण्यापूर्वीच हिंदु राष्ट्र स्थापन करा !

जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय हिंदूंना समवेत घेऊन इस्लामी राष्ट्र बनवण्याचा कट रचला आहे.

अशा ख्रिस्ती शाळांवर बंदी घाला !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘सेंट फ्रान्सिस स्कूल’ या शाळेमध्ये शीख विद्यार्थ्यांना शाळेत येतांना पगडी, कृपाण (लहान चाकू) आणि हातामध्ये कडे घालून येण्यावर बंदी घातली आहे.

स्वार्थासाठी जनतेला वाईट सवय लावणारा आम आदमी पक्ष !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातच्या दौर्‍यावर असतांना, ‘आम्ही राज्यात निवडून आल्यावर ज्याप्रकारे देहली आणि पंजाब येथे विनामूल्य वीज पुरवली, त्याप्रकारे गुजरातच्या जनतेलाही विनामूल्य वीज देऊ’, असे आश्वासन दिले.

भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे राजस्थानचे काँग्रेस सरकार  !

भरतपूरमधील (राजस्थान) आदिबद्री धाम आणि कनकाचल येथे होत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणी साधू-संत ५५० दिवस आंदोलन करत आहेत. या वेळी ६५ वर्षीय विजय दास या संतांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

धर्मांधांचा ‘पूर जिहाद’ जाणा !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे ६ धर्मांधांनी रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला. अजून काही प्रमाणात बंधारा तोडला असता, तर तेथे मोठा पूर आला असता.

हिंदूंमध्ये झालेली जागृती जाणा !

नवी देहली येथील प्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्यामध्ये जाणार्‍या हिंदूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, अशी माहिती येथील ८४ वर्षांचे दिवाण अली मुसा निझामी यांनी दिली.

भारत याविषयी गप्प का ?

बांगलादेशातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांधांनी त्याच्या घरासह हिंदूंची २१ घरे जाळली, ३७ दुकाने लुटली, तर ९ मंदिरांची नासधूस करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली.

हिंदु अल्पसंख्य झाल्यावर होणारा परिणाम जाणा !

गढवा (झारखंड) येथील ९० टक्के मुसलमान असणार्‍या मानपूर गावातील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील ५ हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

कावड यात्रा भारतात होते कि पाकिस्तानात ?

उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. या यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे.