रुग्णाईत असतांनाही सतत अनुसंधानात राहिल्याने आनंदी असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय (वय ६९ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टमी (२५.३.२०२२) या दिवशी नाशिक येथील सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. सिद्धी क्षत्रीय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका (कु.) सुनीता छत्तर यांना उकळत्या पाण्याने भाजल्यावर आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती वाटलेली कृतज्ञता !

माझ्या तोंडवळ्यावर भाजले होते; परंतु माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही. मला मनातून गुरुदेवांविषयी ‘केवढे मोठे संकट टाळून त्यांनी माझे रक्षण केले आहे’, अशी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

अशीच राहो गुरुदेवा, तुमची अखंड कृपा ।

मला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शांतीविधी झाला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सुचलेली कविता पुढे दिली आहे. ‘गुरुदेवा, अशीच तुमची कृपा असू दे’, ही प्रार्थना !

ऋषीयागाच्या पूर्णाहुतीच्या वेळी ‘विष्णुलोकातच गेलो आहोत’, असे जाणवणे

परात्पर गुरुदेव विष्णूच्या रूपात पंचमुखी नागावर पहुडलेले दिसणे, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या लक्ष्मीदेवी आणि अन्य पुरोहित साधक ऋषी आहेत’, असे दिसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या आश्रमांचे अद्वितीयत्व !

ईश्वरी राज्यात रहाणार्‍या साधकांची पिढी निर्माण करणारी वास्तू म्हणजे ‘सनातनचा आश्रम’ !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ‘गतीने होत नाही’, असे वाटत असतांना केवळ परात्पर गुरुमाऊलींच्या चरणांच्या दर्शनाने प्रयत्न करण्याचा निश्चय करणार्‍या सौ. राजश्री तिवारी !

माझ्या प्रयत्नांना गती येत नव्हती. मला अंतर्मुख होता येत नव्हते. त्या वेळी मला सद्गुरु स्वातीताईंची पुष्कळ आठवण आली आणि त्यांचे प्रेम आठवून माझी भावजागृती झाली.

जीवनातील विविध प्रसंगांत मार्गदर्शन मिळाल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या दैवी शक्तीची आलेली प्रचीती !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून नेहमीच साधना, अध्यात्म, राष्ट्र-धर्मविषयीचे मार्गदर्शन मिळत असते. त्याचा व्यावहारिक आणि सामाजिक स्तरावर मला वेळोवेळी उपयोग झाला आहे.

कोरोनाच्या प्रतिकूल काळात वाचकांसाठी आधारस्तंभ ठरलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

कोरोना संकटकाळात समाजात भीतीचे वातावरण असतांना दैनिकातून मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे आम्हाला स्थिर रहाता आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या आसमंतात ढगांच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिसलेले श्री गणेशाचे सुंदर रूप !

सनातनच्या आश्रमात ज्याप्रमाणे विविध देवतातत्त्वे आणि पंचमहाभूते यांचे विविध माध्यमांतून प्रकटीकरण होत आहे, त्याप्रमाणे आश्रमाबाहेरील वातावरणातही अशा प्रकारे सात्त्विक अनुभूती येत आहेत.

माहीम (मुंबई) येथील वाचिका श्रीमती नीता गोरे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक डोक्याखाली ठेवून मी झोपायला प्रारंभ केला आणि समवेत बारीक आवाजात भ्रमणभाषवर नामजप लावू लागले. यामुळे मला पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला.