ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी नाही, तर समष्टी साधनाच आवश्यक !

‘ईश्वर सर्व प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा, यासाठी कार्यरत असतो. हे त्याचे व्यष्टी नाही, तर समष्टी कार्य आहे. अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही समष्टी साधनाच (समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नरत रहाणे) करणे आवश्यक आहे.’

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात भ्रष्टाचार, बलात्कार इत्यादी का नसेल ?

‘हिंदु राष्ट्रातील शाळांत भूगोल, गणित, रसायनशास्त्र इत्यादी आयुष्यात काही उपयोग नसलेल्या विषयांपेक्षा ‘मुले सात्त्विक कशी होतील’ याचे, म्हणजे ‘साधना कशी करायची’ याचे शिक्षण दिले जाईल. त्यामुळे रामराज्यात नव्हते, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी हिंदु राष्ट्रात नसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वैज्ञानिक संशोधनाची मर्यादा !

‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्‍वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निरर्थक साम्यवाद !

शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?

हिंदु राष्ट्रात ‘आयुर्वेदा’चे महत्त्व !

हिंदु राष्ट्रात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे ‘आयुर्वेद’ हा विषय लहानपणापासून शिकवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना लहानपणापासूनच आरोग्याविषयी माहिती ज्ञात होऊन ते रोगराईपासून दूर रहातील.

दिव्याखाली अंधार !

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले