अत्यंत दयनीय झालेली हिंदूंची स्थिती !

‘धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अर्जुनाप्रमाणे स्थिती झालेले बहुसंख्य हिंदू !

‘हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तीवाद करतोस.’ अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तीवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘घरच्याला किंमत नसते’, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले

हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांना विचारूनच कार्य करा !

‘आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून घेतले पाहिजेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्‍वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांचे महत्त्व !

‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले