धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी यांचा दुटप्पीपणा !

‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म !

हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांच्या, क्रूरतेच्या, बलात्कारांच्या, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत . . . हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दिशाहीन बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी !

‘आंधळ्याचे ‘माझ्या पाठून या’ हे सांगणे ऐकणारे ज्याप्रमाणे त्याच्यामागून खड्ड्यात पडतात, तसे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी यांचे आहे. ते दिशाहीनतेमुळे स्वतः खड्ड्यात पडतात आणि त्यांच्यामागून जाणारेही खड्ड्यात पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे सरकारला कळत कसे नाही ?

‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प.पू. भक्तराज महाराजांनी डॉ. आठवले यांना घरच्यांपासून विरक्ती येण्यासाठी दिवाळीला त्यांच्याकडे बोलवणे !

संसारात राहून साधना करणार्‍यांना घरातील माणसांपासून विरक्ती येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज असे करायला सांगायचे.’

मुलांना साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्‍या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कृतघ्नपणाची परिसीमा !

‘आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. ही कृतघ्नपणाची परिसीमा होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रशासन आणि राजकारणी यांना हे लज्जास्पद !

‘चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलीस, प्रशासनातील व्यक्ती आणि राजकारणी एकदा तरी क्षमा मागतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

व्यवहार आणि अध्यात्म यातील भेद !

‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्‍वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन्‌ सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले