अहंकारी बुद्धीप्रामाण्यवाद्यांची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाचा कितीही अहंकार असला, तरी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना छोट्यातील छोटा एकपेशीय प्राणीच काय; पण बाह्य गोष्टींच्या वापराशिवाय दगडाचा एक कणही बनवता येत नाही. याउलट ईश्वराने लाखो पेशी असलेला मानव आणि अनंत कोटी ब्रह्मांडे बनवली आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.

हे भारतासाठी लांच्छनास्पदच !

‘आता बर्‍याच व्यवहारांच्या एकूण खर्चात अधिकृत खर्चासह ‘लाच देण्यासाठी किती खर्च होईल ?’, हेही लक्षात घेतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यासाठी तरी देवाचे भक्त व्हा !

‘तिसर्‍या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रातील कायद्यांच्या पालनाने जनतेची साधनाही होईल !

‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हास्यास्पद साम्यवाद !

‘वनस्पती, प्राणी, मानव इत्यादींत साम्यवाद नाही. एवढेच नव्हे, तर पृथ्वीवर ७०० कोटींहून अधिक असलेल्या मानवांपैकी कोणत्याही दोन मानवांचे धन, शिक्षण, शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत साम्य नाही. असे असतांना ‘साम्यवाद’ म्हणणे हास्यास्पद नाही का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !

‘अध्यात्मशास्त्रातील शिकवणीच्या संदर्भात ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानाचा वापर होतो. ‘अध्यात्म अंतिम सत्य सांगते’, हे सिद्ध करायला, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करायला वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होतो. एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधक-भक्त यांचे श्रेष्ठत्व !

‘विविध राजकीय पक्ष ‘स्वतःच्या पक्षाचे राज्य हवे’, यासाठी पैसे वाटप इत्यादी वाईट मार्गांचा वापर करतात. याउलट साधक आणि भक्त ‘ईश्वराचे राज्य स्थापन व्हावे’, यासाठी प्रयत्नशील असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अधोगामी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

याला लोकशाही म्हणता येईल का ?

‘लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य.’ याउलट भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीत बहुतेक सर्वच पक्षांचे राज्य ‘स्वतःचे, स्वतःसाठी आणि स्वतःकरता चालवलेले राज्य’, असे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले