हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप प्रतिदिन अधिकाधिक करा !

हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. यासाठी आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत; म्हणून आजपासून स्वतःच्या साधनेच्या जोडीला प्रतिदिन शक्य तितका वेळ किंवा कमीतकमी २ घंटे आपल्या उपास्यदेवतेचा किंवा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करावा. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल.

सनातनच्या आश्रमात कोण राहू शकतो ?

‘सनातनचा आश्रम पहायला येणारे काही जण विचारतात, ‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

‘साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘त्याग करायला एक तरी दैनिक शिकवते का ? केवळ सनातन प्रभात शिकवते. त्यामुळे सनातन प्रभातच्या वाचकांची अध्यात्मात प्रगती होते, तर इतर दैनिकांचे वाचक मायेत अडकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हास्यास्पद सर्वधर्मसमभाव !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मायेतील शिक्षण आणि साधना यांतील भेद !

‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्ती करायला शिकवते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले