‘रागावणे किंवा भांडण करणे’, यांमुळे आपली साधना व्यय होते !

आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. आपण केवळ स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करू शकतो. कुणी चुकत असले, तरी आपल्याला त्याला रागावण्याचा अधिकार नाही.

‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने ध्वनीप्रदूषण करणार्‍या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही’, असे म्हणणारे पोलीस असणे, हे लज्जास्पद !

यातून पोलीस खाते एकतर निष्क्रीय आहे किंवा पोलीस अधिकार्‍यांचे रेव्ह पार्ट्या करणार्‍यांशी साटेलोटे आहे, असे वाटल्यास चुकीचे
काय ? ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त हे कळूनही तो नवीन का घेतला नाही ? न्यायालयाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा !

‘भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये’, हे एका मानवाधिकार कार्यकर्त्याला समजते, ते भारत सरकारला का कळत नाही ?

‘भारताने एकाही अफगाणी मुसलमानाला शरणार्थी म्हणून स्वीकारू नये. भारत अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिंदू आणि शीख यांना शरण देत आहे, हे कौतुकास्पद आहे.

गणेशभक्तांसाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा नामजप उपलब्ध होणार 

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार नामजपांची केलेली निर्मिती !

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक केबल वाहिनीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते इत्यादी माहिती असेल.

‘भारतनिष्ठा’ हा सार्‍याच पक्षांचा मानबिंदू असायला हवा !

‘भारत आणि भारतनिष्ठा हा सार्‍याच पक्षांनी परम पवित्र असा मानबिंदू मानावयास हवा होता. भारतमातेच्या रक्ताने रंगलेले हात कुठल्याही प्रलोभनासाठी कुणीही हातात घ्यावयास नको होते; पण प्रत्यक्षात मात्र काही विपरीत घडले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ४.९.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर इंग्रजी भाषेत विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अफवा आणि वास्तविकता याविषयी ज्ञात करून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे इंग्रजी भाषेत आयोजन करण्यात आले आहे.

उघड चालणारे धंदे न दिसणारे पोलीस आंधळे कि भ्रष्ट ? अशा पोलिसांना तात्काळ कारागृहात टाका !

‘गोवा राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने २४.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री कालकोंडा, मडगाव येथील एका अनधिकृत कॅसिनोवर धाड टाकून १० जणांना कह्यात घेतले.