राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर ३० एप्रिल या दिवशी सुनावणी होणार !

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाच्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात ३० एप्रिल या दिवशी दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे. यापूर्वी त्यांच्या जामिनावर २९ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार होती.

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ मेपर्यंत वाढ !

पोलीसदलातील स्थानांतराच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांची कोठडी वाढवून मागितली आहे.

धुळे येथे ८९ तलवारी सापडल्याप्रकरणी चौघांना अटक !

पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळे येथे येणारी संशयास्पद चारचाकी गाडी दृष्टीस पडली. पोलिसांनी चारचाकीसह अनुमाने ७ लाख १३ सहस्र ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

गोव्यात प्रतिवर्षी १२ किशोरवयीन मुली गर्भवती होतात !

केवळ गर्भवती रहाणे आणि गर्भपाताच्या गोळ्या घेणे, या समस्यांवर उपाययोजना म्हणून लैंगिक शिक्षण देणे, हा त्यावरील पर्याय घातक ठरू शकतो. त्यामुळे ‘अल्पवयीन मुलींनी विवाहापूर्वी कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू नयेत’, यावरच उपाययोजना, म्हणजे मूळ कारणावरच उपाययोजना काढणे श्रेयस्कर आहे ! यासाठी मुलींना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे !

मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिटात ५० टक्के कपात ! – रावसाहेब दानवे

वातानुकूलित लोकलच्या तिकिटाच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. वातानुकूलित रेल्वेच्या तिकिटांच्या दरात किती कपात करावी ? याविषयी जनतेचे मत घेतले होते.

यवतमाळ जिल्हा परिषदेत अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईची चेतावणी !

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अचानक दिलेल्या कार्यालयीन भेटीत अनेक विभागांमध्ये ३३ कर्मचारी विनाअनुमती अनुपस्थित आढळले.

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे ! – ‘जनसंवाद सभे’ची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? जनतेची अडचण दिसत नाही की, यामध्येही भ्रष्टाचार केलेला आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प वाचवण्याची राज्यपालांकडे विनंती !

झोपडपट्टीवासियांच्या संघटनेचे राज्यपालांना निवेदन