२२ एप्रिलपासून एस्.टी. बस पुन्हा पूर्ण क्षमतेने धावणार !

नोव्हेंबर २०२१ पासून एस्.टी.च्या कामगारांनी संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठरणारी एस्.टी. बस ठप्प झाली होती; मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत ७० सहस्र कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

अमरावती येथे भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

जिल्ह्यातील अचलपूर येथे झालेल्या दंगलीमागे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा हात असून त्याच या दंगलीच्या मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप येथील भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केला होता.

भोंग्यांविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

भोंग्यांच्या प्रश्नाविषयी निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बोलवण्यात येणार आहे.

समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी कृतीशील व्हा ! – सौ. कांचन शर्मा, हिंदु जनजागृती समिती

पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षापद्धत आणि एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यातून धर्मशिक्षण मिळत असे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमानही वृद्धींगत होत असे; पण आता धर्मशिक्षणच मिळत नाही आणि मुलेही कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण घेतात.

अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांच्यासह २७ आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी !

अचलपूर येथील २ गटांतील दगडफेकीचे प्रकरण, अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडण्यास नागरिकांना बंदी !

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ‘पॅन कार्ड’वरील जन्मदिनांक आणि शालेय शिक्षणातील जन्मदिनांक यात तफावत का ? – समरजितसिंह घाटगे, भाजप

ते म्हणाले, ‘‘मला जातीयवादी म्हणणारे हिंदूंची मते मिळवण्यासाठी वाढदिवसाला श्रीरामनवमीचा आधार घेऊन दिशाभूल करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच जातीयवादी आहेत.’’

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक लावा ! – बाळा नांदगावकर, मनसे

मंदिरांप्रमाणे मशिदींमध्येही ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावा, असे ट्वीट  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

कात्रज (पुणे) चौकातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

कात्रज परिसराचा पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन २५ वर्षे झाली, तरी मूलभूत सुविधा आणि विकास होत नाही. जाणीवपूर्वक डावलले जात असून नव्याने समाविष्ट ३४ गावांची तीच अवस्था आहे.

सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ब्राह्मण समाजाची अपकीर्ती होत असतांना त्याला हसून दाद देणारे जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांचा निषेध ! – विश्वजित देशपांडे, अध्यक्ष, परशुराम सेवासंघ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची (पुरोहितांची) अपकीर्ती केली.

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे ! 

अशी मागणी का करावी लागते ? खरे तर शासनानेच गड आणि स्मारके यांचे संवर्धन स्वत:हून करायला हवे ?