(म्हणे) ‘भाजप हिंदु आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करत आहे !’ – असदुद्दीन ओवैसी

ओवैसी पुढे म्हणाले, ‘‘ देशात महागाई आणि बेरोजगारी यांची समस्या वाढली आहे; मात्र मोदी सरकार मंदिर आणि मशीद या वादात अडकले आहे. ताजमहाल आणि लाल किल्ला येथे खोदकामाची मागणी केली जाते

पुण्यात ७ लाख ७३ सहस्रांची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त !

विनापरवाना बनावट सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणार्‍या वाकडमधील दत्त मंदिराजवळील मे. ग्रूमिंग एन्टरप्रायझेस प्रा.लि. येथून २४ मे या दिवशी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ७ लाख ७३ सहस्र रुपयांचा साठा जप्त केला आहे.

पनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी !

शिवरायांची कर्मभूमी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची जन्मभूमी असणार्‍या रायगड येथे हिंदु राष्ट्राचा जयघोष !

‘सिलिका सायंटिफिक’ आस्थापनाला आग !

अंबिकानगर भागात असलेल्या ‘सिलिका सायंटिफिक’ या प्रयोगशाळेतील साहित्य बनवणार्‍या आस्थापनामध्ये २९ मेच्या रात्री १० वाजता आग लागली. अर्ध्या घंट्यामध्ये तेथे ५ स्फोट झाले.

कोरेगाव भीमा प्रकरणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना आयोगाकडून साक्ष देण्यासाठी ‘समन्स’ !

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुण्यात होणार्‍या सुनावणीच्या काळात साक्षीदार म्हणून ६ आणि ७ जून या दिवशी उपस्थित रहाण्यासाठी ‘समन्स’ बजावले आहेत. आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी राव यांना समन्स बजावल्याला दुजोरा दिला आहे.

पुणे येथील ‘ससून’मधील ८०० परिचारिका संपामध्ये सहभागी !

संप म्हणजे राष्ट्राची हानी ! सरकारने संबंधितांच्या अडचणी समजून घेऊन वेळीच उपाययोजना काढली असती, तर ही वेळ आली नसती.

दुकानावर ‘भगवे स्टीकर’ असणार्‍या व्यापार्‍यांकडूनच वस्तू खरेदी करणार ! – सावरकर जयंतीला हिंदु महासंघाची पुणे येथे शपथ

‘मी माझ्या कुटुंबासाठी लागणार्‍या सर्व जीवनावश्यक वस्तू हिंदु धर्माचा आदर करणार्‍या बांधवांकडूनच घेईन’, अशी शपथ सावरकर जयंतीच्या निमित्ताने हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी २८ मे या दिवशी पुणे येथे घेतली.

(म्हणे) ‘हिंदु महासंघाची शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद !’ – जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ‘ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे, त्याच दुकानातून वस्तू खरेदी करू’, अशी शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘हिंदु महासंघाची ही शपथ, म्हणजे बहिष्कार आणि वर्णवर्चस्ववाद आहे.’’

आज संभाजीनगर येथील ३ वसाहतींतील ८०० अवैध नळजोडण्या तोडणार !

प्रशासनाने अवैध नळजोडण्यांमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हेही शोधावे.